STORYMIRROR

Anju Metkar

Classics

4  

Anju Metkar

Classics

कृष्ण मेघ

कृष्ण मेघ

1 min
272

मेघदूतांचा सांगावा आला

सजण भेटीस्तव आतुर बाला

दूरदेशी प्राणसखा गेला

बरसू देत आता झिम्माड सरीला।।१।।


युगांतरीच्या गूढ प्रीतीला

शब्दावाचूनच कळावे या रितीला

अंतरी काहूर मनी भय साथीला

न विसरो माझा मानमित मला ।।२।।


कधी पहाटे समीरा संगे इशारा

कधी अंबरातील घन नीळा रंग बावरा

ऊन सावलीचा हा खेळच न्यारा

कोसळू देत सरींसह गारा ।।३।।


तप्त काया अन् शिणला देह सारा

उसवली धरित्री अन् शुष्क पडला झरा

वैशाख वणवा काहीलीचा सोसवेना मारा

बरसू देत आता तरी सरसर धारा ।।४।।


शांत सुरम्यशा सांजवेळी

बरस आता तू ओथंबून गाली

तिमिरास चीरो विद्युल्लता बलशाली

उत्कट प्रीतीच्या या मोहक काली ।।५।।


देवघरातील समई तेवली

मनी चिंतन ओष्ठी नामावली

हरिरंगी राधा हरपली

मेघश्यामाची हीच चाहुली ।।६।।


कुजबुजती या फुलांसवे मंजिरी

अलगुजाची त्या धुन गहीरी

लाजते अधोवदना राधा बावरी

सरीतच चिंब सख्यामिलनाची आस पुरी ।।७।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics