STORYMIRROR

Manisha Awekar

Classics

4  

Manisha Awekar

Classics

संत मीराबाई

संत मीराबाई

1 min
593

काव्यप्रकार अभंग (६/६/६/४)


मोठ्या घरी नांदे / मीरा हरिभक्त

मनी तिच्या फक्त / हरिनाम


हरिमय भक्ती / मुरारीची पूजा

मनी भाव दूजा / कधी नसे


मीरा झाली दंग / हरिभजनात

जहर दूधात / कालवले


प्राशन तयाचे / भाबड्या मीरेने

भक्तीभावनेने / श्रद्धामृत


भोळा भक्तीभाव / दाटे अंतरात

सदा चिंतनात / श्रीकृष्णाच्या


उच्चकोटी भक्ती / कृष्ण अद्वैतात 

पूजन मनात / भक्तिभावे


वेडी हरिभक्ती / कुणाला कळेना

जनसामान्यांना / वेडी मीरा


ईश्वरा कळली / भाबड्या मीरेची

आस दर्शनाची / मनोमनी


दर्शन देऊनी / पावन मीरेला

जन्म सार्थकाला / लावियला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics