गझल
गझल
सत्य बोलणे कुणा पटेना आता
शांत राहणे मला जमेना आता
पाप पुण्य ते मानत नाही तेथे
मर्जी त्यांची कुणी बघेना आता
गाव असावा छान चिमुकला वाटे
हिरवळ तेथे बरी दिसेना आता
गंध फुलांचा असा पसरला सगळा
फुलांत भवरा पहा हटेना आता
मंद वाहतो गार पवन हा इकडे
शहरात अशी हवा मिळेना आता.
