अभंग विठू माऊली
अभंग विठू माऊली
आषाढी कार्तिकी
ओढ पंढरीची
तुझा दर्शनाची
परंपरा
रूप मनोहर
शोभे पितांबर
कर कटिवर
ठेवुनीया
पुंडलिका भेटी
उभा विटेवर
देहाचा विसर
निरंतर
आगळी ती भक्ती
जीव आसूसला
भक्तीचा भुकेला
वारकरी
विठू माऊलीचा
चालतो गजर
मुखात साखर
सकलांचा
विसरावा क्रोध
संसाराचा ताप
जाई आपोआप
मोहमाया
वारकरी दंग
सुंदर अंभंग
मनात श्रीरंग
ठेवूनिया
असे धक्काबुकी
दर्शन घेण्यास
पूरीकर आस
भक्तगणा
