STORYMIRROR

Sarita Parsodkar

Classics Others

4  

Sarita Parsodkar

Classics Others

गवळण

गवळण

1 min
395

काय सांगू कान्हाची या, प्रीत आगळी

लज्जेने चूर चूर झाली, मी ग सगळी../धृ/


किती नटखट , किती खोड्या करतो

गवळणीच्या मागे मागे, कसा फिरतो

तूझे मित्र कान्हा सारी ,वाटे बगळी

काय सांगू कान्हाची या, प्रीत आगळी

लज्जेने चूर चूर झाली मी ग सगळी..(.१)


सासू सासरे आणि घरी, आहे पती.

नको ओढू सारखा माझा, हात हाती

धडधड करते माझी, छाती सगळी

काय सांगू कान्हाची या, प्रीत आगळी

लज्जेने चूर चूर झाले, मी ग सगळी..(२)


तुझे चालणे माझ्या, मनाला मोही

कालियाचे मर्दन केले तू, यमुना डोही

हर्षभराने नाचे ,गवळ्याची पोरे नागळी

काय सांगू कान्हाची या, प्रीत आगळी

 लज्जेने चूर चूर झाले मी ग सगळी..(३)


एका जनार्दनी ही ,गवळण राधा

श्रीकृष्णाची तिला, जडली बाधा

श्रीकृष्ण प्रेमातच ती, भासे वेगळी.

काय सांगू कान्हाची या, प्रीत आगळी

लज्जेने चूर चूर झाले, मी ग सगळी..(४)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics