गोठान
गोठान
1 min
168
अरे गोठान गोठान
तिथ जमतं सारे गुरं
बिन चाऱ्या पाण्याविन
काळजीचा दीसे नूरं....१
दिवेलागण ही होता
घराकडे तिला ओळी
मांग उभा तो गुराखी
गळ्यामंदी त्याच्या झोळी...२
ती रानात गेल्यावर
फिरे वन वन रानी
दारि येता मालकाच्या
पाये आसेन वयूनी....३
चारा घाला हो त्यायला
नाय मांगत ते काई
नगा विकू कसायाला
कापनार तो कसाई....४
नद्या-नाले ते आटले
नाही प्यायले ते पाणि
सारी लावा तूमी झाड
मोठ कराची घ्या हमी....५
दारी बांधा एक गाय
पुण्य बांधा हो पदरी
सारी राखाया दुनिया
पहा येईन शीरहरी....६
