श्रावण सरी
श्रावण सरी
1 min
246
धवल अभ्रकाची उशी
त्यात चांदण्याची शेज
नीलवर्णी आकाशात
चमकले कसे आज तेज..!!
वारा गाई धूंद गाणी
रात राणी बहरली
काजव्याच्या पुंजक्याने
मॄनमई प्रकाशली...!!
आता श्रावणसरींनी
धरा ओलिचिंब झाली
पक्व डाळिंबासमान
आली अधरावर लाली..!!
फुल गोंडस गोजीरे
कसे मांडीवर खेळे
भिजल्या त्या तरुवर
किलकिले पक्षांचे ते मेळे ..!!
