दुरोळ्या
दुरोळ्या
1 min
235
तुला पाहताना मी आठवात न्हाली
ओघळणारे अश्रू ओथंबले गाली...
किती होते स्वप्न साकारले मी जीवनी
सारखी मी त्यात वाहवत गेली...
कशे अधीर ते बाहू रेशिम स्पर्शा
हुरहूर गात्रात तशीच राहून गेली....
किती केला होता शृंगार त्या रातीला
भावनेतूनच ती मला फसवून गेली...
दरवळे रातराणी त्यात मधुमालती ही
केवडा निशीगंधाला लाजवून गेली...
जरी स्पंदने वाढली होती उरात
जागीच ती माझ्यासम स्थिरावून गेली ...
ओष्ट किती होते अधिर चुंबनास
मिलनाची रात्र ती सांगून गेली..
