STORYMIRROR

Sarita Parsodkar

Children

4  

Sarita Parsodkar

Children

पाऊस

पाऊस

1 min
285

इकडे तिकडे वेडा, सुसाट पळतो वारा

धो-धो येई पाऊस ,टप टप पडती गारा/धृ/


आकाशात विजांचा, गडगडाट झाला..!

थुई थुई नाचत, मोर बघा आला.!

पडताच पाऊस कसा, फुलवी पिसारा..!

धो-धो येई पाऊस टप टप पडती गारा.. !! ‌/१/


आज वाटते मोठा ,येणार आहे पाऊस..!

घरीच बसून कॅम्पुटरचा, फिरवू माऊस..!

आईच्या भोवती चकरा, मारू गरगरा..!

धो धो‌ येई पाऊस ,टप टप पडती गारा... ‌!! /२/


आळी मिळी चूप ,सारेजण बसा.!

कोपऱ्यात बसून ,खुदु खुदु हसा.!

आज पाटी पुस्तक सारे दूर सारा..!

धो धो येई पाऊस, टप टप पडती गारा..!!../३/


पुरे झाला खेळ ,आता तयारीला लागा..!

 नको छडी, धपाटा

 शहाण्यासारखे वागा..!

बाबांचा शिन आता, उडून जाईल सारा..!

धो धो येई पाऊस ,टप टप पडती गारा.. ‌!! /४/


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children