वेळ नाही..
वेळ नाही..




आता तिलाही उसंत नाही मलाही वेळ नाही
जुळविलेल्या गणिताचा कुठलाच मेळ नाही...
जोडणीत सरले आयुष्य कळले सोपा खेळ नाही
आंबट गोड म्हणायाला जगणे काही भेळ नाही...
सगळेच कसे मनाजोगे तेव्हा आता ती सुवेळ नाही
सूर हरवल्यावर ओठातून फुटत साधी शीळही नाही...
आठवणी मोजत बसलो तर पडत आता पीळ नाही
चुकले कळून हातामध्ये उरला आता फार वेळ नाही...