अनामिका....
अनामिका....
आज हीं मी, पूर्ण नाही
उणिव हीं, जाणवतें....
सारे आहे, थोडे नाही
ती बेचैनी, वाढवतें.....!
कुठें तरी, खोल मनी
उपस्थिती, दर्शवितें....
अंतरंग, हीं पोकळी
रात रात, जागवतें.....!
मन वेडे, वेडी आशा
पुन्हा पुन्हा, पाचवतें.....
नितळ ते, प्रेमपाणी
झुळुझुळु, पाझरतें.....!
प्रतिबिंब, त्या स्वप्नांचे
नको तेव्हा, डोकावतें....
सारें काही, नवनीत
नवे रूप, स्विकारतें....!
चिरंतन, अनामिक
अधिराज्य, गाजवतें.....
सांजवेळी, पश्चिमेस
वेदना ती, मावळतें....!
सारे कधी, झाले नाही
अतृप्तता, गोंजारतें....
भेटण्याची, ओढ मनी
दोन्ही डोळे, पाणवतें....!
