STORYMIRROR

Pandit Warade

Classics

4  

Pandit Warade

Classics

शारद चांदरात

शारद चांदरात

1 min
189

शरद पौर्णिमा घेऊन आली

स्फूर्ती चैतन्य नवी नव्हाळी

पूर्ण  चंद्रमा कोजागिरीचा

नभाला देतो शुभ्र झळाळी ।।१।।


जीवनी सदा जागे असावे

न व्हावे विस्मरण क्षणाचे

छोटीसी जरी चूक घडली

बदलती  रंग  जीवनाचे ।।२।।


मंद मंद पावलांनी  लक्ष्मी 

'को जागरती'  पुसत  येते

हितासाठी जो जागतो त्याच्या

कुंकू भाग्याचे भाळी लावते ।।३।।


धवलरंगी  दुग्ध  शर्करा

तशीच  शारद  चांदरात

शुभ्र स्वच्छ धवल असावे 

नसावा कलंक जीवनात ।।४।।


सखे घेउनी हातात हात

शीतल शारद चांदराती

शुभ्र धवल चंद्र प्रकाशी

गुज कराया बसू एकांती ।।५।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics