STORYMIRROR

Sanjana Kamat

Classics

4  

Sanjana Kamat

Classics

धबधबा

धबधबा

1 min
437

खळखळे शुभ्र दुग्ध सरीता होत,

तुषार उधळीत डोले धुंद मस्त.

मुग्ध कारंज्याचे स्वर्गमयी दृश्य,

परमानंद दातृत्वात सृष्टी गंधाळत.


झरे गर्जती विद्युतलतेच्या गती,

करे अविष्कार नवनिर्मिती साठी.

मृदगंध मदनात धुंद तो कोसळत,

अवनीच्या मनमोहक सौंदर्यासाठी.


जन्मान्तरीचे ऋण बहार फुलवी,

सुगंध परीमळत स्पर्शून धरणीस.

खळाळे निर्झर रंग भरे सुमनात,

झंकार प्रित जीव करे कासावीस.


मिलनास ओलांडून दरी ते डोंगरे,

सभोवतालचे बहरे सृष्टीचे प्रांगण.

झंझावाती विशाल लाटा तळमळत,

हिरवाई भासे रोमांचक अमृतकण.


अखंड धबधबा सौदर्य दैदिप्यमान

चराचरात विविध सुगंध परिमळत,

देहभान विसरे निसर्गाची पखरण,

चैतन्याचा सदैव बहार दरवळत.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics