फुलबाग (गझल )
फुलबाग (गझल )
चाफा फुले बागेतला.. पाहून घे आता बरे
त्याच्या सुवासाने तुला.. हरवून घे आता बरे
झाडे अशी आहे बरी.. वाढीव ती गावाकडे
देवास माळा घालतो.. ओवून घे आता बरे
जाई जुई कोणा नको.. वासामुळे लोका दिसे
गजरा तयांचा ओवते..माळून घे आता बरे
पिवळ्या गुलाबाने मला.. मोहीत केले बघ जरा
येई मनी उत्साह तो..जाणून घे आता बरे
भरली अशी फुलबाग ही..देई मना आनंद रे
मग मी मनी आनंदते.. सजवून घे आता बरे
रोपास पाणी देवुनी..सारी निगा राखा खरी
फुलबाग ठेवा नीट तर ..बहरून घे आता बरे
देवीस चाफ्याचा भला ..मोठा असा गजरा करू
माळा तयांच्या घालुनी . मापून घे आता बरे.
