Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.
Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.

Smita Phadatare

Classics


4.5  

Smita Phadatare

Classics


सुख ..❤

सुख ..❤

1 min 271 1 min 271

घरात कोणी नसताना आवडणारा पिक्चर TV वर लागणं म्हणजे सुख.

आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत कोणी नसताना भरभरून बोलायला मिळणं म्हणजे सुख..

आयुष्यात एखादी व्यक्ती एकदाच भेटल्यानंतर, कारण परत भेटण्याचा Chance च नसतो हे माहिती असतं, तेव्हा एकमेकांना, I miss u always म्हणणं म्हणजे सुख..

निसर्गाशी एक वेगळं नातं निर्माण केल्यानंतर आपल्याला सारं समजायला लागणं, पटायला लागणं म्हणजे सुख..

आपला आपल्या देवावरचा विश्वास आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर,पावलांवर दृढ व्हायला लागणं म्हणजे सुख..

कधीतरी सत्कृत्य केल्यानंतर स्वतःच्या चेहऱ्यावरचं समाधान आरशात पाहताना ओठांवर आलेलं हसू म्हणजे सुख..

प्रत्येक परिस्थितीत आपल्याला साथ देणारी एक तरी मैत्रीण आपल्याजवळ आहे हे समजणं म्हणजे सुख..

जगाशी दोन हात करून आपलं मत पटवून देता येतं हे स्वतःला माहिती असणं म्हणजे सुख..

मंद ,हळुवार पावसामध्ये कोणीच नसताना एकटं चिंब भिजणं म्हणजे सुख

पापण्या ओल्या झाल्यानंतर प्रिय व्यक्ती आपसुकच भेटणं म्हणजे सुख..

स्वतः एखादी कथा, कविता लिहिल्यानंतर पुन्हा पुन्हा वाचताना, पुन्हा नवीन काहीतरी लिहायला प्रेरणा मिळणं म्हणजे सुख..

जगातल्या कोणत्याही गाण्याचे Lyrics जेव्हा आपल्या आयुष्याला लागु पडायला लागणं म्हणजे सुख..

एखाद्या व्यक्तीला मनसोक्त का जगायचं? हे पटवून देताना, त्या व्यक्तीला पटणं म्हणजे सुख..

मुड खराब झाल्यानंतर जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून, तू चाल रं पुढं तुला र गड्या भीती कशाची पर्वा बी कुणाची..या गाण्याचे बोल ऐकायला मिळणं म्हणजे सुख..


Rate this content
Log in

More marathi poem from Smita Phadatare

Similar marathi poem from Classics