Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.
Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.

Smita Phadatare

Others


3  

Smita Phadatare

Others


मला एक दिवस माझ्या आजीला भेटायचंय..

मला एक दिवस माझ्या आजीला भेटायचंय..

1 min 194 1 min 194

मला एक दिवस माझ्या आजीला भेटायचंय..

तिच्यासोबत खेळायचंय, हसायचंय आणि तिलाच बिलगायचंय..😅

मन 😏माझं ती नसताना कितीही उदास झालं तरीही मला तिच्यासोबत हसायचंय..

जरी भरलं पोट तरीही ते पुन्हा तिच्यासोबतच भरायचंय..

खरंच मला आता एक दिवस माझ्या आजीला भेटायचंय..

ओळखीच्याच गर्दीमध्ये बाजारात पुन्हा एकदा फिरायचंय..😇

आज मात्र माझ्या आजीचा हात मला धरायचाय..

खरंच मला आता माझ्या आजीला भेटायचंय..

मी खुप वाट पाहतोय त्या दिवसाची

मागणी मी घालतीये माझ्या स्वामीना..

स्वामी..डोळे भरून पुन्हा एकदा तिला पाहायचंय..

तिच्याच मांडीवर डोकं ठेवून मन भरून एकदा रडायचंय..😂

खरंच मला अाता माझ्या आजीला भेटायचंय..

जाताना मला सांगुन का नाही गेलीस??

वाट पाहिली तुझी..तरीही परतुनी नाही तू आलीस..

खुप थकलोय मी..तू नसताना माझ्या आयुष्यात..परत पुन्हा पुन्हा तुला आठवताना..

कधीतरी भेटशील का मला पुन्हा एकदा..?

खरंच मला आता माझ्या आजीला भेटायचंय.. 

गुलाबाच्या काट्यांना मुठीतच तु आवळतेस..🌹

तुझ्या डोळ्यातल्या अश्रूंना लाजाळूच झाड तू बनवतेस..

उंच उंच आकाशात झेप घेणाऱ्या झाडाचं खोड तू असतेस..

खरंच मला आता माझ्या आजीला भेटायचंय..

माझ्या जगाचा केंद्रबिंदू तु..

पुढे पडणाऱ्या माझ्या पावलातलं बळ तु..

डोळे बंद केल्यानंतर पुन्हा पुन्हा दिसणारी ती तुच..

माझ्या सगळ्या चुका माफ करणारी तीही तुच..

तु कधीही माझ्या आयुष्यातुन वजा होऊ शकत नाहीस..तू कीतीही दूर गेलीस तरीही..

खरंच मला आता माझ्या आजीला भेटायचंय..

समजुन घेणारी तु आणि समजुन सांगणारी तीही तूच..

किती आणि काय काय सांगु तुला..?मनातल्या शब्दाची घुसमट होतीये, पण ते ओठांवर येण्याआधीच त्या शब्दांना मी अबोल करून टाकलं..पण एकांतात ते नकळत वाहू लागलेत..😇

डोळ्यांत सारं पाणी साठवून ठेवलयं मी..कधीतरी भेटशील तू मला म्हणून..


Rate this content
Log in