Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.
Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.

Smita Phadatare

Romance Action


3  

Smita Phadatare

Romance Action


तेव्हा आपण भेटू...

तेव्हा आपण भेटू...

1 min 239 1 min 239

जगाच्या एका कोपऱ्यात तू आणि एका कोपऱ्यात मी असल्यानंतर,

तुझं आणि माझं मन आठवणीने भरलेलं असेल तेव्हा आपण भेटू..

आजुबाजुची परस्थिती आपल्या दोघांनाही चुकीचं ठरवत असेल,

तर मग का चुकीचं ठरवत आहे या प्रश्नाचं उत्तर तुला आणि मला शोधावसं वाटेल तेव्हा आपण भेटू..

तुझी साथ मला आणि माझी साथ तुला हवी असेल तेव्हा आपण भेटू..

आयुष्यात, तुझ्या आणि माझ्या पापण्या आपसुकच ओल्या होतील तेव्हा आपण भेटू..

एकमेंकानाही सोबतचं जग पाहायचं असेल, समजून घ्यायचं असेल तेव्हा आपण भेटू..

आकाशामध्ये जेव्हा चंद्र ताऱ्यांची वाट पाहत असेल तेव्हा आपण भेटू..

प्रेम म्हणजे नेमकं काय? या खूप मोठ्या प्रश्नाचे उत्तर नव्हे तर,

या प्रश्नाच्या उत्तराकरिता शब्द शोधायचे असतील तेव्हा आपण भेटू..

क्षितिजापलीकडेही जेव्हा दोघांनाही जावंसं वाटेल तेव्हा आपण भेटू..

जाणीवेच्या जबाबदारीतून जेव्हा तुला मला पहावसं वाटेल तेव्हा आपण भेटू..

आयुष्याच्या प्रत्येक पावलांवर माझी जबाबदारी तुला घ्यावीशी वाटेल तेव्हा आपण भेटू.. ❤😇


Rate this content
Log in

More marathi poem from Smita Phadatare

Similar marathi poem from Romance