मला प्रचंड आशा आहे..
मला प्रचंड आशा आहे..
मला प्रचंड आशा आहे, कधीतरी हा निसर्ग न्याहाळता येईल, समजून घेता येईल.
मला प्रचंड आशा आहे, कधीतरी माझा दिवस नक्की येईल.
मला प्रचंड आशा आहे, कधीतरी हे जग खूप सुंदर होईल.
मला प्रचंड आशा आहे, कधीतरी सत्य जगासमोर येईल.
मला प्रचंड आशा आहे, सुखाचा शोध कधीतरी लागेल.
मला प्रचंड आशा आहे, कधीतरी परिस्थिती माझ्या सुद्धा बाजूने असेल.
मला प्रचंड आशा आहे कधीतरी मनसोक्त जगायला मिळेल.
मला प्रचंड आशा आहे कधीतरी मी कुणाची तरी आदर्श असेल.
मला प्रचंड आशा आहे कधीतरी माझा देव मला भेटेल.
मला प्रचंड आशा आहे कधीतरी मला समजून घेणारं कोणीतरी भेटेल.
मला प्रचंड आशा आहे कधीतरी डोळ्यातलं पाणी थांबेल.
मला प्रचंड आशा आहे कधीतरी, काही झालं असलं तरी
उगाचच नाही झालं नाही असं म्हणावं लागणार नाही.
मला प्रचंड आशा आहे कधीतरी 'नाही' म्हणायला नक्की शिकेन.