तुळस
तुळस
अंगणी माझ्या तुळस
घराची शोभा वाढवते
येणाऱ्या जाणाऱ्याचे
स्वागत ती ग करते
माझी हो तुळसबाई
हिरवी कंच उभी दारी
संस्कृतीचा वारसा जपे
मंजीरी तिची साजरी
आयुर्वेदाची हो जननी
मुळे पाने खोड माती
सारे आहेत उपयोगी
वंश परंपरेने जपते नाती
प्राचीन काळापासून हिची
विठ्ठलाच्या गळी ही मानिनी
सती म्हणूनी महती जगी
विष्णूप्रिया ही अर्धांगिनी
नमस्कार सदा माझा
तुळसीच्या समर्पणास
नमोस्तुभ्यम देवी तुळशी
आरोग्य लाभो आपणास
