कोजागिरी
कोजागिरी
अंबरी चांदण्यांचा सडा शिंपत.
चंद्र सोळा कलेने तेजाळ धुंदला.
शोभे नभी चांदण्यात कोजागिरी,
आसमंतात प्रेम गुलाल उधळला.
अमृत् प्याला घेऊन आली रात्र,
चंद्र ही आतूर निघाला भेटीला.
प्रेम सागरात चंद्र बेधुंद बुडाला.
प्रेम लीलेचा शृंगार पूर्ण झाला.
धुंद चांदण्या लखलखाट करता,
दुधात प्रतिबिंब चंद्राचे लाजत.
दुध साखरेसम एकरूप जीवनी,
प्रेम,जिव्हाळा,फुलवी मनी वसंत.
चंद्र आला अंगणी माझा दारी.
चांदणचूडात मंत्रमुग्ध कोजागिरी
लागे भवसागरातून नाव किनारी.
उधळे पूर्णामृताचा तुषार संसारी.

