पाऊस आला पाऊस आला पाऊस आला..!!
पाऊस आला पाऊस आला पाऊस आला..!!


मित्र आणि सखा तो बनुनी हळुवार येतो
वारा ही अलगद डोलू लागे त्या समवेत लाटा उसळतो..
बालपणीच्या आठवणीत कागदी होडी बनून घेतो..
उगाच वाटे हाताच्या बोटांवर नाच तो करत राहतो..
पाऊस आला पाऊस आला पाऊस आला..!!
पाऊस येता स्वतः ही पाऊस होवून जावे
मन हे कोरडे असले तरी स्वःता ही पाऊस व्हावे..
कधी असच वाटतं छोट्या सुखासाठी झगडावे..
पाऊस एकटा येतो आता त्यांचे संगे बरसावे..
पाऊस आला पाऊस आला पाऊस आला..!!
अंगणी चिखल आणि त्यात मातीचा सुगंध दरवळतो..
वाफाळेला चहा कुरकुरीत कांदा भजीचा सुवास पसरतो..
आनंदाचे डोही आनंद मनी हा तरंगत जातो.
.
हिरव्या गार पाण्यावरती काही वेगळाच रंग चडतो..
पाऊस आला पाऊस आला पाऊस आला..!!
खिडकी वरून पडणारा एक थेंब ओळखीचा वाटू लागला..
नाते कोणते माहित नाही पण मला माझा सखा मिळाला..
कधी कधी पाऊस म्हणता म्हणता सगळं काही भिजवून गेला..
नव्या आलेल्या पालविला नवा कोवळा जन्म देवून गेला..
पाऊस आला पाऊस आला पाऊस आला..!!
खिडकीत बघताना तो डोळ्यात टिपून घेतो आहे..
जुगारुन सारे पाश मला मोकळा श्वास घ्यायचा आहे..
कोणीतरी पावसाकडे डोळे लावून पाहते आहे..
का कुणास ठाऊक त्यात कोणाचा चेहरा दिसत आहे..
पाऊस आला पाऊस आला पाऊस आला..!!