STORYMIRROR

Prashant Bhandare

Comedy Others Children

3  

Prashant Bhandare

Comedy Others Children

पाणीपुरी

पाणीपुरी

1 min
246

भरल्या पोटी डिवचत जाते फुगली पाणीपुरी

शेव मीठ अन चाट पाहुनी कोण परततो घरी

आंबटचट्टू पाणी वरुनी आलू चटणी भरे

भीक मागती धरून थाळी मुखात फोडत झरे


सोनेरी वर शेव टाकुनी कांदा उधळे वरी

हात डुंबतो कोपरावरी तमा नसावी तरी

मोजत वाटे अमृत गोळे राजाभैया जरी

हिशेब ठेवी कोण बापुडा मुखात गेल्या वरी


उगाच म्हणती 'हा हा' आणिक 'भैय्या! थांबो जरा'

डोळ्यामधुनी काढत पाणी विनोद होतो खरा

हासत जाती मागे बघुनी किती लोक थांबले

शिव्या घालुनी ग्राहक म्हणती खाणे खोळंबले


संपत जाते आवर्तन अन खेळ तिथे थांबतो

घेउनी सुकी एक पापडी चमू मुखी कोंबतो

ढेकर देउनी सरती मागे खादाडी मंडळी

गाड्याभवती पुन्हा नव्याने तयार होते फळी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy