STORYMIRROR

Prashant Bhandare

Drama Tragedy Children

3  

Prashant Bhandare

Drama Tragedy Children

आठवण

आठवण

1 min
167

का सुकले मुख सांग मुली कसली सल, दुःख तुला इतुके 

ओल दिसे नयनात तुझ्या बघताच क्षणी मग श्वास चुके

बोल कुणी म्हटले तुजला भलते सलते उलटून कधी

काय असे पडले उपरे भरली दुथडी तट पूर्ण नदी


ओरडले घरचे जर का तर सांग मला तसले घडले

आज रडे बघ भातुकली तुज वाचुन सर्व इथे अडले

का बसलीस उदास आता हरपून उगाच मुली हसणे

कातरतो बघ जीव पुन्हा बघताच तुझे रुसणे फुगणे


बंधन सोडुन मुक्त बटा चिकटून बसे नयना भवती

खारट गोंद तिथे दिसते कुठुनी चढली अधरांवरती

बांधुन हस्त उगा बसली हसली न कळी बघ मौन प्रिया 

आर्जव मी करतो तिजला कर दूर अबोल मनास बया


आठवली मजला जननी बिलगून मला वदली तनया

भार कसा हृदयी भरला स्मरताच सखी मज प्राणप्रिया

सावरुनी मग मी मजला उचलून तिला सदनी रमलो

प्रश्न विचारत ती सुटली मग उत्तर देत जरा दमलो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama