STORYMIRROR

Prashant Bhandare

Romance Tragedy Inspirational

3  

Prashant Bhandare

Romance Tragedy Inspirational

भेट

भेट

1 min
232

ऐकून कहाणी माझी

सोडले मौन चाफ्याने

कल्लोळ नभाने केला

बरसले थेंब ताफ्याने


वाऱ्यावर पसरत गेली

विरहाची दुःखद गाथा

मारवा पसरला गगनी

वटवृक्ष टेकवी माथा


ती होती अन मी होतो

नाट्यात गुंफली पात्रे

प्रीतीचे बंधन होते

आकंठ बुडाली गात्रे


क्षण वसंतातले सरले

ग्रीष्माचे चटके बसले

सोडून सखी मज जाता

का दैव विखारी हसले


डोळ्यात दाटले पाणी

श्वासात विराणी उरली

अश्रूंची भरली ओंजळ

भेटीचा शेवट ठरली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance