STORYMIRROR

Prashant Bhandare

Abstract Classics Inspirational

3  

Prashant Bhandare

Abstract Classics Inspirational

संविधान आणि आजची पिढी

संविधान आणि आजची पिढी

1 min
165

न्याय बंधुता समतेसाठी संविधान हे घडले

या घटनेने गणराज्याचे पाउल पुढती पडले

विरोध झाले चर्चा झाल्या कच्च्या मसुद्यावरती

मूलभूत जनहक्कासाठी भीमराव हे लढले


मजूर वंचित शेतकरी अन महिलांचा सन्मान

सामाजिक आर्थिक नीतीचे पूर्ण ठेविले भान

विचार श्रद्धा अभिव्यक्ती अन विश्वासू स्वातंत्र्य

व्यक्तीप्रतिष्ठा,राष्ट्र एकता बंधुत्वाची खाण


शिक्षण झाले सोपे आणिक मक्तेदारी सरली

भारतीय जनतेची ओंजळ सौख्य फुलांनी भरली

नागरिक या भारतभूचा बनला येथे राजा

जनशाहीही जगात मोठी आदर्शाची ठरली


अधिकारांनी नवउंचीवर बहुजनांना नेले

किल्मिष इथले जातिपातिचे समाजातुनी गेले

सर्वधर्म सम भावभावना यांचा आदर केला

लिहित भिमाने संविधान हे जगणे उन्नत केले


कथा,गोष्ट ना विश्वग्रंथ हा नियम स्वतः पाळावे 

सर्व मानवा मार्ग दाखवी जगी कसे वागावे

न्याय बंधुता समानतेचे धडे सदा गिरवावे

नव्या पिढीने पुन्हा पुन्हा हे संविधान वाचावे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract