STORYMIRROR

Prashant Bhandare

Others

3  

Prashant Bhandare

Others

दिशाहीन पाखरे

दिशाहीन पाखरे

1 min
969

आयुष्याच्या वाटेवरती कोण वागते कसे

मार्ग दाखवी कोल्हे आणिक वाट चालती ससे

मुखवट्यातले खरे चेहरे लपवतात भावना

विश्वासाला मोडत करती लक्ष्मीची याचना


कर्जाखाली गुदमरते का कष्टाची भाकरी

नैतिकतेला तुडवत जाते सरकारी चाकरी

कृतज्ञतेचा कृतघ्नतेने इथे दाबला गळा

लोभापायी मूर्ख माणसे किती सोसती झळा


रंग बदलले सत्तेसाठी दुनियेने आगळे

बनवत सुटला मानव येथे कळप वेगवेगळे

विज्ञानाने पापाचीही भीती का संपली 

विचार करतो निर्मिक आता माया का गुंफली


गोठुन गेल्या सर्व भावना हृदय जणू ठोकळा

गुलाम झाला मेंदू येथे श्वास कुठे मोकळा

नाते इथले स्वार्थापुरते मोठी झाली घरे

आनंदाची वाट विसरली दिशाहीन पाखरे


Rate this content
Log in