पाणी हेच जीवन
पाणी हेच जीवन
जीव न् जीव पाण्यासाठी वणवणतोय
वसुंधरेचा आक्रोश कानी ऐकू येतोय
पशुपक्ष्यांना पाणी,वृक्षवेलींना पाणी
शेतीला पाणी,उद्योगधंद्याला पाणी
वृक्षतोडीमुळे सिमेंटचे जंगल वाढले
पाण्याची बचत न केल्याने साठे संपले
ना पाणी अडवले,ना पाणी जिरवले
ग्लोबल वाॅर्मिंग,प्रदूषण वाढतच राहिले
आता तरी मानवा डोळे उघड,जागा हो
पाण्याचा थेंब थेंब वाचवण्या सज्ज हो
पाण्याची काटकसर करून अंमल कर
जलप्रतिज्ञेसह जलसाक्षरतेचा पण कर
पाण्याचा एक थेंब जीवनात आहे अनमोल
पाणी वाया घालवून जीवन नको मातीमोल
