ओंजळीतले हास्य
ओंजळीतले हास्य
ओंजळीतले हास्य तुझ्या
जपून का तू ठेवतो,
ओळखीच्याच वाटांवरूनी
अवघडून का चालतो?
मनातले भाव तुझ्या
लपवून का तू ठेवतो,
परिघातल्या नात्यांतूनही
अंतरून का बोलतो?
ओघळते शब्द तुझे,
बांधून का तू ठेवतो,
संवादाचे दार तू
ओढून का ठेवतो?
खळाळते हास्य तुझे
येऊ दे आता ओठांवरी,
ओंजळीतला आनंद तुझ्या,
पसरू दे वाटेवरी