ओळखा कोण...
ओळखा कोण...
स्वतःच्या धुंदीत मस्त राहतो
मला पकडायला सर्व धावते
माझे रंग अनेक मी फिरतो बागेत
बागेमधे आहेत फुले अनेक
त्यांना बघून मन माझे डुले
मी आहे एक फुलपाखरू भले
या फुलावरून त्या फुलावर
करतो मी लांब प्रवास
घ्यायला फुलामधला मधाचा रस
माझ्या मधासाठी लोक सहन
करते डंक माझ्या काट्याची
मी आहे एक मधामधली मधमाशी
मला पकडून पिंजऱ्यात टाकते
माझ्या कडून मनुष्य बोली बोलून घेते
लाडाने माझे नाव ठेवतात खूप
कोणी विठू तर कोणी म्हणते राघू
मला आवडते हिरवी मिरची फार
मी आहे एक पालतू पोपट...
