ओलावा शब्दांचा
ओलावा शब्दांचा
प्रेमात म्हणा किंवा कवितेत
ओलावा हवा असतो...
शब्दांचा
कारण बोलता तुम्ही तरीही,
शब्दच असतात दुवा
दोन हृदयांचा
मोल शब्दांनाच ना शेवटी,
रुक्ष तुम्ही असला तरी
पक्ष घ्यावा शब्दांचा
भावनांना ओल हवी खरं तर,
शब्द तिथूनच पाझरतात
तोच उगम प्रेमाचा