STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Drama

1  

Asmita prashant Pushpanjali

Drama

न्याय

न्याय

1 min
2.9K


न्यायदेवता बनून

न्यायाचे पारडे हातात घेऊन

न्याय देतांना

कधी कधी हे ही पहावे लागते

की,

एकाला न्याय देताना

दुसऱ्यावर तर आपण

अन्याय करीत नाही...


एकाच्या न्यायाची किंमत

दुसऱ्याला अन्यायाने

तर मोजून द्यावी

लागत नाही...


कधी कधी हे ही पहावे लागते

मी स्वतःवरच तर

अन्याय करीत नाही...


आणि सगळ्यात मोठा गुन्हा

स्वतःवर स्वतःच अन्याय करण्याचा

कारण अशी व्यक्ती दुसऱ्याला

न्याय देऊच शकत नाही

जो स्वतःला न्याय देऊ शकत नाही...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama