न्यारा पिवळा
न्यारा पिवळा
न्यारा पिवळा रंग हा
निर्दषनात्मक खास
सर्व रंगात खुलतो
भासे स्वप्नाळू आभास.....१!!
सुर्यप्रकाशाची लाली
देई आनंद अपार
तेजोमय वसुंधरा
चैतन्याच्या दिशा फार.......२!!
मोहकता अंगी घेत
किरणांचे आगमन
हळदूल्या भावनांनी
भरलेले सारे मन..... .३!!
रंग पिवळा हर्षाचा
मांगल्याचा वास धरी
परिणम प्रसंगाला
नव्या जगा साथ करी.....४!!