नवयुग ललना
नवयुग ललना
शिक्षणाचे अस्त्र शस्त्र
फुले दांपत्याने दिले
शिक्षणाने स्वावलंबी
पथ प्रगती चालले
शिक्षणाने , नोकरीने
बुद्धिमत्ता सिद्ध केली
उच्चपदी बढतीने
समताच सिद्ध केली
सर्व क्षेत्रे पादाक्रांत
नाही कुठे मी कमी
निर्णायक मत त्वरे
कर्तृत्वाची देते हमी
तिन्ही दलांमधे नारी
पराक्रम गाजवते
बळ रणरागिणीचे
तिच्या अंगी संचारते
सारा आसमंत माझ्या
आला भासतो कवेत
मम मनीची सदिच्छा
मान लाभो महिलेस
