नवीन विचार...!
नवीन विचार...!
नवीन विचार
मांडायचा म्हणतोय
पण कोणाला ते
आवडेल का?
प्रश्न तसा साधा
पण अंतर मनाला भिडणारा
आणि आतल्या आत
उगाचच पोखरणारा
पण विचार केला
म्हंटल नवीनच डाव मांडायचा
तर कालचा दिवस
विसरलेलाच बरं
आता नवीन पाटी
नवीन डाव
नवीन दिवस
नवीन जीवन
हसत हसत
सामोरं जायचं जीवनाला
आणि कवेत घ्यायचं
नव्या जीवनाला
श्री गणेशा केलाय
आता चांगली सुरुवात झालीय
म्हणून तर मित्रांनो
शुभ रात्री म्हणताना खूप बरं वाटतंय...!
