नवीन पाऊल माझे घरी
नवीन पाऊल माझे घरी
सुख हे दारी आले तुझ्या येण्याने
पहिले पाऊल पडता दारी तुझे
घर ही हसताना दिसले...
नवीन नाती नवीन माणसे
नुसता गोंधळ आणि किलबिाटाने
अन् तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झाले..
अहो ची साथ आहे मन ही आठवणीने
अगदी व्याकूळ झाले तुझे
हेच आम्हा सगळ्यांना दिसले..
पाठराखीन जसी आज साथ आहे
तशीच आम्ही सगळे तुझी साथ करणार आहे
तू एकटी नाही हे तुला ह्या साऱ्यातून समजले..
अनोळखी नाही पण खूप दिवसाची ओळख आहे
आता आजपासुन तू आमची आम्ही फक्त तुझे
हे ह्या खास दिनी सांगायची वेळ ही आली आहे..
तू आहेस तशीच रहा आनंदात आणि हसमुख
जशी तू आल्या पासून खुश आणि हसरी आहे
तरच हे संपूर्ण कुटुंब ही हसते खेळते राहणार आहे..