नवचैतन्याचा पाडवा
नवचैतन्याचा पाडवा
मराठी नववर्ष आले
घेऊन गुढीपाडव्याचा सण
चैतन्य आणि पावित्र्याचे
जपून ठेवू ऊरात हा क्षण....१
स्वागत करू या रामाचे
विजयी पताका तोरणे बांधून
दारी सजली सडा रांगोळी
औक्षण करून हाती बांधू कंकण...२
गुढी उभारली दाराशी
चंदेरी सोनेरी वस्त्रे लेऊन
कडुनिंब आणि साखरगाठीने
तांब्याचा कलश त्यावर ठेवून...३
संकल्प करावा मनाशी
नाते होईल सुदृढ आणि पक्के
आशीर्वाद मोठ्यांचा घेऊ
मिळणार नाही आयुष्यात धक्के...४
नवचैतन्याचा पाडवा हा
घेऊन येते सुखसमृद्धी
नको दुखवू नये कधी कोणा
होत राहिल सतत वृद्धी...५