नमन अहिल्यादेवी
नमन अहिल्यादेवी
अलौकिक शूर तेजस्वी
महाराणी अहिल्यादेवी
महान कार्यकर्तृत्वाने
इतिहास घडविला रणी (१)
रणनीतीचे शिक्षण
हुशारीने घेतले
महिलांना शिकवूनी
सैन्यात सामावले (२)
शिवशंभूंची आराधना
भक्तिभाव अर्पिले
अनेक मंदिरे घाट बांधूनी
जिर्णोद्धारही केले (३)
न्यायदानात निःपक्षपाती
पारदर्शकता कारभारात
राजमाता देवीमाता
पुण्यश्लोक विभूषित (४)
पंचकन्यांमधी जयघोष
अग्रक्रमाने अहिल्यादेवींचा
यश किर्ती सन्मान संपादूनी
अमरत्वचि लाभे राजमातांना (५)
