Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manjusha Galatage

Inspirational

4  

Manjusha Galatage

Inspirational

नक्षत्रांचे देणे

नक्षत्रांचे देणे

1 min
311

शुभ्र , सौम्य , नीरव नि निश्चल ,

चांदवा तो चकवी मन चंचल ..

अलवार चांदण्या घेऊन संगे ,

उठवी शांत डोही तरंगे ..

नभी रजनीचा झुरणारा चांदवा ,

दूर कुठे वनी जागणारा काजवा ..

गर्दीतल्या त्या नक्षत्रांतही ,

का अपूर्णतेचा ध्यास असावा ?

कोणती ती वीण निषेला जोडणारी ,

कालातीत वेदनांना नव्याने मांडणारी ?

प्रफुल्लित चांदण्यांत शोध त्या साऱ्यांचा ,

ढळलेल्या, जागलेल्या, तुटलेल्या ताऱ्यांचा ..

अबोल डोही नक्षत्रांच्या,

स्वप्नांचे निःशब्द जागणे ..

तुटत्या, निखळत्या ताऱ्यालाही,

इप्सित मनाचे सांगणे ..

धुक्यात हरवली वाट तरीही ,

मंद प्रकाश बरसत जाणे ..

गर्द , दाटल्या काळोखीही ,

नित्य , नव्याने, निखळ हसणे ..

..... हेच तर नक्षत्रांचे देणे !!

Rate this content
Log in