नजरेतून समजले सारे
नजरेतून समजले सारे
पुनवेच्या त्या रात्री
चंद्राच्या मंद प्रकाशात
बहरली होती रातरानी
सुगंध भरला परिसरात
भरभर उचलत पावले
धावले सागर किनारी
मध्येच कितीदा अडखळले
पर्वा नव्हती अंतरी
अचानक बुलावा आला
हृदयाची धडधड वाढली
काय झाले जिवलगाला
चिंता सतावून गेली
समीप जाता प्रियकर
क्षणार्धात मागे सरला
मानले ज्याला जोडीदार
त्यानेच अंत पाहिला
चेहऱ्यावर शुष्कता जाणवली
कळले त्याचे इशारे
शेवटची भेट आपली
नजरेतून समजले सारे