निसर्ग किमया
निसर्ग किमया
श्रावणाचे आगमन होता,
वृक्ष-वल्लरी बहरुनि गेली,
अवचित येता श्रावणसरी,
वसुंधरा चिंब चिंब न्हाली...१!
गंधित धुंदीत श्रावण आला,
रिमझिम पडे पाऊस धारा,
फळा, फुलांना बहर येतसे,
आसमंत होई सुगंधी सारा...२!
जाई, जुई, मोगरा,रातराणी,
ओथंबून बहर ये चराचरी,
हिरवाईने नटली धरणी,
आनंद विलसतो घरोघरी...३!
हिरवागार मऊ मखमली,
गालिचा पसरला भूवरी,
चाले खेळ ऊन पावसाचा,
सप्तरंग नभी इंद्रधनुवरी...४!
धुंद गुलाबी गंधित वारा,
अंगांगावर येई शहारा,
निसर्गाची किमया न्यारी,
किरणांचा सोनेरी पहारा...५!