निसर्ग गावचा
निसर्ग गावचा
उगवला पहा हा दिनकर
जागा झाला सारा गाव
कोकिळेचे मधुर कूजन
पाण्यावर ती झुले नाव
गावामध्ये बळीराजा
उगवी सारी धान्यपिके
थंडगार वात वाही
प्रभातीला दिसे धुकें
सर्जाराजा पळें डौलात
.. . घुंगुरमाला त्यांच्या गळ्यात
शेती करतो बळीराजा जोशात
. पैका खेळतो त्याच्या हातांत
वाड्यावर माडी दिसे
होई कष्टाचं सार्थक
. घाम गाळून शेतात
बळीराजा राबे अथक
चारचाकी गाडीतून
फिरे बळीराजा माझा
कष्ट करुनि पिकवी
नको दुष्काळाची सजा
दाटी आमराईची इथे
पिके हापूस वाडीत
माल जाई परदेशात
पैसा खेळतो खिशात
