निरागस
निरागस
न्याहळते आई आपुल्या बाळाला
निरागस ते निजले घेऊन स्वप्ने ती का
हास्य गालावर पाहताच वाटे आईस
काय बाळास माझ्या स्वप्नी दिसते आहे
हा बाळकृष्ण का पुर्व जन्मिचा
मी देवकी यशोधा ,माझा गर्भ धन्य झाला
रूप पाहता तुझे हे गर्व मज होतो
तु राज कुमार माझा ,छकुला गोंडस बाळ
उतरवू तुझ्याहून नजरेन लिंबलोण
ना दृष्ट लागो कुणाची ,ठेवीन तुज पदरात
माझ्या सोनुल्या तु आहेस जीव माझा
गाते तुज अंगाई आज तुझी रे आई
स्वप्नात येऊ दे राजा तुझ्या रे विर रत्न
येऊ दे शीवबा अन त्यांचे पराक्रम
होशिल का तु विर पुत्र या मातृ भुमिचा
करेन मी हि गर्व मग तुझ्या पराक्रमाचा
