STORYMIRROR

Bhagyashri Chavan Patil

Drama Romance Action

3  

Bhagyashri Chavan Patil

Drama Romance Action

नातं त्याच आणि माझं

नातं त्याच आणि माझं

1 min
194

हे कधी ना कधी होणारं होतं

जे मला आधीच समजलं होतं..


जितकं राहायचं तितकं राहुन घेतलं होतं

त्याच्या नजरेत मी स्वतःला परक पाहिलं होतं..


खरच होत काही जे इतक्या पटकन संपलं होतं

तात्पुरतं राहुन कोणाच्या बंधनात राहणार होतं..


जे कधीच खर होणार नाही हे ही माहित होतं

थोडंसं सुखं देणार अळवा वरचं पाणी होतं..


कधी खरं तर कधी खरंच खोटं भासत होतं

उगाच रंगवलेल्या स्वप्नावरचं एक छोट कारण होतं..


एकातून बाहेर पडता दुसऱ्यांनी आपसूक बाहेर काढलं होतं

वेळ जात नाही म्हणुन काय परत तुटलेल्या मारलं होतं..


जे आवडत नाही तेच राहुदेत म्हणून मनापासुन केलं होतं

पण ते ही काही क्षणात विखुरलेल आणि लांब गेलं होतं..


स्वप्नवत सुरुवात जिथे झाली तिथेच ते नातं संपलं होतं

शेवटचं पान लिहून त्याला जणू माझ्यातून मुक्त केलं होतं..


भवतेक आयुष्यातील शेवटची चुक सगळं करून झालं होतं

परत कोणी आपलं भेटेल यात मन परत शोधायला निघाल होतं.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama