STORYMIRROR

Prashant Shinde

Drama

3  

Prashant Shinde

Drama

नात

नात

1 min
10.6K


नात माझी लाडकी

काखेत येऊन बसली

पहाणाऱ्यांची कशी

तिने फजिती केली


आई नाही बाबा नाही

आज्जी नाही मावशी नाही

साऱ्यांची दांडी गुल केली

काखेत येऊन माझ्या भलती खुश झाली


दुधावरची साय हिला म्हणतात

ते काही खोटे नाही

या नात्याच्या गोडीला

दुसरी खरे काही उपमा नाही


स्पर्श मुलायम तिचा

खूप खूप मला सुखावतो

आजोबाचे सौख्य मला

तो विधाता या रूपाने देतो


नात अशी फाकडी

आहे माझी लाडकी

कोवळी कोवळी गोड

जणू लुसलुशीत काकडी...!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama