STORYMIRROR

Shabana Mulla

Inspirational

3  

Shabana Mulla

Inspirational

नारी

नारी

1 min
583


आधीची...ती


चूल आणि मूल

विश्व तिचे होते

त्याच्या पलीकडे

अस्तित्वच नव्हते


चौकटीत राहणं

मान्य केलं तिने

संसाराच्या रथाला

जुंपून घेतलं हिने


सोसायच्या किती

गर्भारपणाच्या वेदना

मुलगा नसेल तर मात्र

तिलाच देतात यातना


आताची ती


शिक्षित करून स्वतःला

सक्षम तिने बनवले

आव्हाने सगळी स्वीकारून

आयुष्य आपले घडवले


उंच भरारी तिने घेतली

निर्णय घ्यायला खंबीर झाली

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून

जबाबदाऱ्या पार पडू लागली


नारी तुझ्या जीवनाची

तूच आहेस शिल्पकार

सगळ्यांच्याच आयुष्याला

तूच देई सुवर्णकार



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational