नारी शक्ती..
नारी शक्ती..
नारी तू एक शक्ती आहे.
नारी तू एक भक्ती आहे.
जग निर्माण करणारी
तू एकमेव व्यक्ती आहे
नारी तू एक शक्ती आहे.
सावित्रीची लेक तू
स्वप्न सत्यात उतरवण्याची
ताकद तुझ्यात
तिला तू निरखून पहा स्वतात
घेवून तू लेखणीची खड्ग
पुरुषी अहंकाराला
दे उत्तर बेधडक
नाही तुझ्यावर
कुणाची सक्ती आहे
नारी तू एक शक्ती आहे
तू दुर्गा बन
तू बन शक्ती आदी
पांडवांत
वाटली जाणारी
बनु नको द्रोपदी
कलियुगातील कौरवांना
दाखवून दे तू
महिषासूरमर्दिनी आहे
नारी तू एक शक्ती आहे
तू नाहीस सीता
अग्नीपरिक्षा देणारी,
तू नाही सती
जिवंतपणी जळणारी
अन्यायाविरुद्ध
पेटणारी तू
झाशीवाली
राणी आहे
नारी तू एक शक्ती आहे.
रूढी परंपरांची
तोडून बेडी
स्वतःसाठी कधीतरी
तू जग थोडी
प्रगतीच्या वाटा
खुल्या तुझ्या साठी
चार भिंतीतून
बाहेर पडण्याचा उशीर आहे
नारी तू एक शक्ती आहे.
नाही तू अबला
नाही कुणाच्या कौतुकाची आणि
सन्मानाची
लाचार तू
तुझ्यापासूनच निर्माण
झालेले हे जग
तुला काय देणार आहे
तू साक्षर,तू सक्षम
तू सर्वशक्तिशाली आहे
नारी तू एक शक्ती आहे.
