मोकळी जागा..!
मोकळी जागा..!
लहान पणापासून
मोकळी जागा
खूप खुपते अगदी
डोळ्यातल्या कुसळा सारखी
कधी बाबा
बाहेर गेले की
मोकळी जागा
घर करते कुरूपा सारखी
आई नजरे
आड झाली की
मोकळी जागा
खायला उठते राक्षसां सारखी
ताई घरी
नसली की
मोकळी जागा
सारखी सलते नकुरड्या सारखी
ती दिसेनाशी
झाली की
मोकळी जागा
रान उठवते मधाच्या पोळ्यासारखी
तो साथी
भेटला नाही की
मोकळी जागा
वेड लावते दारुड्या व्यसना सारखी
अशी ही मोकळी जागा
भरण्यातच सारा जन्म सरतो
दुसऱ्याच्या डोळ्यातलं मुसळ
नजरे आड होण्यासाठी
जेंव्हा ही मोकळी जागा
प्रेमाने स्नेहाने भरते
तेंव्हा आकाश ठेंगणे होते
जन्म सार्थकी लागल्याचे समाधान मिळते
जीवन जगणे कृथार्थ होते
जन्म एकदाच
जीवन एकदाच
जगणे एकदाच
जगविणे एकदाच
मनसोक्त जगा ,जगू द्या
आनंद द्या ,आनंद घ्या
आनंदी रहा ,आनंदित राहू द्या
आपल्या चांगुल पणाने
मोकळ्या जागा भरत रहा
जीवन निरंतर जगत रहा
प्रत्येक क्षण पुलकित करा
आनंद द्विगुणित करा...
जीवन फार सुंदर आहे
त्याचा पुरेपूर आस्वाद घ्या....!!
