मनमोर
मनमोर
शालू हिरवा नेसून
कशी वसुधा नटली
तिला पाहून सर्वांच्या
हौस मनाची फिटली।।१।।
येता पावसाच्या सरी
बीज कसे अंकुरते
मनी प्रसन्न होऊन
रूप रोपाचे धरते।।२।।
वृक्ष, वेली, पशू, पक्षी
सारे पावसात न्हाती
झुळूझुळू वाऱ्यासंगे
ताल धराया लागती।।३।।
झाडा वेलींच्या मधून
ऊन कसे डोकावते
जणू धरणी मातेची
काया कोमल चुंबिते।।४।।
ऊन कोवळे पडता
दृश्य दिसते सुंदर
येता सरीवर सरी
नाचू लागे मनमोर।।५।।
