मनकवडा
मनकवडा
मनकवड्या मनासोबत
मनकवडी नजर ही असावी
भाव मनीचे ओळखूनी
नजरेतून नजरेत बसावी
मनकवडे मन असेल तर
जगणे ही सोपे होते
दाह जखमेचा कमी होऊन
सुंदरतेला बहर येते
मिळाला तू मनकवडा मला
भाग्यचं समजावे मी माझे
पाण्यावर्ती काठी मारता
थेंब पाण्याचे छन छन वाजे
मनकवडे मन लाभे ना सर्वांना
देवाघरची देणगीच ती
भेटली प्रिया अशी मला
भाग्याची साथ मिळाली जशी ती
कवयित्री नालंदा वानखेडे
नागपूर
