मनभावन श्रावण
मनभावन श्रावण
सरीवर सर झरझर येती
श्रावणधारा मोदे बरसती
हासत नाचत लाजरा श्रावण
प्रेम बरसत येईल साजण
घननीळ धारा संतोषे अवनी
भरजरी वस्त्र शोभे पाचूवर्णी
थंडगार वारा शीतल झुळूक
नभी इंद्रधनू रश्मीची चुणूक
सोन हिरवाई वसुंधरा खुले
गंधाळलेली वसुधा बहरे
शुभ्र धबधबे प्रपात कोसळे
थेंब रजताचे तुषार उसळे
अशात साजणाची वाट पाहते
मनी मीलनातुर साजणी होते
अशात साजण अवचित येई
तन मन तिचे मोहरुन येई
ओल्या वर्षावात प्रेमातूर वृत्ती
अंगोपांगी खुले मीलनाची तृप्ती
